मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अकोला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला

  बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात   जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला अकोला, दि. 21 : बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कार्यवाहीत रोखण्यात आला. आता मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करून देणार नाही, असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले आहे.  ( फोटो इंटरनेट वरून घेतलेला आहे, Image Source - Internet)   बार्शिटाकळी तालुक्यातील निंभारा गावात एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मंगळवारी (20 फेब्रुवारी) मिळाली. त्यानंतर कक्षातर्फे पथकाने तत्काळ या गावात जाऊन माहिती घेतली. बालविवाह होणार असल्याची खातरजमा झाल्यावर पथकाने मुलीच्या पालकांची भेट घेतली व मुलीचे वय 18 वर्षांहून कमी असल्याने आपण लग्न लावून दिल्यास आपल्यावर बालविवाह अधिनियम 2006 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न लावून देणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. त्यामुळे हा बालविवाह रोखला गेला. या कार्यवा...