मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

खामगाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निमकवडा पोरज शिवारामध्ये कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा

पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत कृषी विभागाची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निमकवडा पोरज शिवारामध्ये कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा तालुका कृषी अधिकारी सुनील पवार व मंडळ कृषी अधिकारी पिंपळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम चालू आहे दिनांक 27/11/2024 रोजी निमकवळा व पोरज येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. भू आणि जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्चाचा पर्याय म्हणजेच पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने कमी उताराच्या जागी वाळू मातीने सिमेंटच्या रिकाम्या गोण्या भरून वनराई बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. असे केल्याने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने जमिनीतील भूजल पातळी वाढते त्यामुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सिंचन क्षेत्रांमध्ये वाढ होते तसेच गुराढोरांचे व जंगलातील वन्य प्राण्यांची पुढील अनेक दिवसापर्यंत तहान भागविली जाईल. बंधारा बांधण्याकरिता कृषी सहाय्यक ए.जे टेके, पोरज येथील पोलीस पाटील सु...