मुख्य सामग्रीवर वगळा

बुलढाणा येथे भूमि हक्क परिषदेचे बेमुदत आमरण उपोषन आंदोलन सुरु, या आहेत प्रमुख मागण्या.


दिनांक 4 मार्च 2024 भूमि हक्क परिषद महाराष्ट्र ने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे संघटनेच्या प्रमुख 10 मागण्या प्रशासनासमोर आहेत या मागण्या पुढील प्रमाणे आहेत, 

बेमुदत आमरण उपोषन आंदोलन सुरु करण्यात येईल याची संबंधीत प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती.

आंदोलनातील मागण्या :-

१.बुलडाणा जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजुर केलेल्या वनहक्क अपिलधारकांच्या अपिलदाव्याबाबत पुनर्विलोकन करण्यात यावे तसेच नामंजुर केलेल्या दावेदाराच्या दावा प्रकरणामध्ये कोणत्याप्रकारच्या त्रुटया आहेत हयाबाबत दावेदारास जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अद्यापपर्यंत लेखी स्वरुपातकळविले नाही. ते दावेदारास कळविण्यात यावे तसेच माळेगाव (वनवस्ती) येथील संपूर्ण वनहक्क दावेग्रामसभेकडे न पाठवता परस्पर जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अपात्र केले आहे त्यामुळे या दावेदारांच्यादाव्याची पुन्हा तपासणी करण्यात यावी व प्रत्येक दावेदाराच्या दावा प्रकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारच्यात्रुटया आहेत त्याची पुर्तता करण्याची दावेदारास संधी देण्यात यावी.

२.बुलडाणा जिल्हयातील ई-क्लास महसूल विभागाच्या जमीनीवरील १९९० पुर्वीच्या पात्र अतिक्रमणधारकांना त्वरीत मालकीहक्काचे कायमपट्टे वाटप करण्यात यावे

३. माळेगाव (वनवस्ती) पो.राजूर ता.मोताळा जि.बुलडाणा हया गावाला महसूली दर्जा देण्यात यावातसेच येथील आदिवासी बांधवांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय, आदिवासींना घरकुल, विज, रस्तेइत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

४.वनविभागाच्या वनक्षेत्रातून रेती, माती इ. गौण खनिज चोरी गेले आहे याबाबत सबळ पुराव्यानिशीसंघटनेने केलेल्या तक्रारीच्या संदर्भात तात्काळ कार्यवाही व्हावी.बोराखेडी पो.स्टे. हद्दीमध्ये सुरु असलेले वरली मटक्या सारखे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करुन सामान्य नागरीकांचे उध्वस्त होत असलेले संसार थांबविण्यात यावे.


६.जळगाव जामोद तालुक्यातील पावरी या आदिवासी महाराष्ट्रा बाहेरील असलेल्या वनजमीनीवरील अतिक्रमणधारकांना उपविभागीय वनहक्क समितीने अपात्र ठरविल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने बेकायदेशीरपणेपात्र ठरविले आहे. सदरचे दावेदार हे महाराष्ट्र राज्या बाहेरील मध्यप्रदेशातील आहेत तसेच त्यांचे पुर्वजहे मध्यप्रदेशातील असल्याने त्यांना चुकीच्या पध्दतीने अधिकाराचा गैरवापर करुन संबंधीतांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हास्तरीय वनहक्क समितीने पात्र ठरविलेले वनहक्क दावे तात्काळ रद्द करण्यात यावे.

७.मलकापूर नगर पालीका हद्दीबाहेरील मुस्ताकअली नगर या वाडी वस्तीतील नागरीकांना पिण्याच्यापाण्यासाठी वाढीव पाईप लाईन टाकण्यात यावी.


८.बोरखेड ता.जि.बुलडाणा येथील बगर आदिवासी असलेल्या शिवाजी हरचंद झाल्टे यास जिल्हास्तरीय वनहक्क समितीने दिलेल्या वनजमीनीचा मालकीहक्क रद्द करण्यात यावा.

९.माळेगाव (वनवस्ती) येथील नागरीकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा तसेच या गावाला स्वस्तधान्य दुकान तसेच आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड देण्यात यावे.

१०.मोताळा येथील वादग्रस्त तहसिलदार यांची तातडीने बदली करण्यात यावी. 


टिप्पण्या