आबकी बार चारशेला ब्रेक लागणार.
प्रस्थापितांना लगाम लावण्यासाठी विस्थापितांची लढाई.
MLVA चे एकमेव मुस्लिम उमेदवार असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी जाहीर.
दोन एप्रिला अर्ज दाखल करणार.
वादळी पत्रकार परिषदेत रोठेंची खास फटकेबाजी.
सप्तरंगी लढतीत सामाजिक ध्रुवीकरणात अस्लम शाह विजयी होनार.
अँड.सतीशचंद्र रोठे पाटील.
बुलढाणा
प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई लढण्यासाठी लोकसभेच्या रणसंग्रामात महा लोकशाही विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी 30 मार्चला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून MLVA चे संयोजक ॲड सतीशचंद्र रोठेंनी जाहीर केली आहे.
ईव्हीएम, एनआरसी, सीएए, महागाई,भारतीय निवडणूक आयोग, बेरोजगारी, धर्मवाद जातिवाद, शिक्षण, अदानी अंबानी, खाजगीकरण यासह विकासात्मक कार्यावर महायुती महाआघाडीच्या उमेदवारांनी बोलावे. या राष्ट्रीय मुद्द्यांसह जिल्ह्यातील हुकूमशाही, दादागिरी, स्वगृही अधिकारी,अनधिकृत व्यवसाय, शेतकऱ्यांची व्यथा, रोही रानडुक्कर,क्राईम रेट, व्यसनाधीनता, यावर चिंता व्यक्त करीत लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणारी वक्तव्ये यावरही सडेतोड भूमिका जाहीर केली आहे.
हा तर टेलर आहे 26 एप्रिल पर्यंत दैनंदिन पुराव्यानिशी एक पिक्चर आम्ही दाखविणार आहोत. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांना जनतेसमोर जाणेही कठीण होईल. त्यामुळे महाराष्ट्रात तरी आबकी बार चारशे पारला ब्रेक लागेल. केंद्रातही सत्तांतर होईल असा विश्वासही यावेळी रोठेंनी व्यक्त केला.
MLVA चे विदर्भातील सर्व उमेदवार दोन एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती पाहता महायुती, महाआघाडी,वंचित व अपक्ष सर्व उमेदवार सामाजिक मतांचे ध्रुवीकरण करत आहेत. तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार मराठा हिंदू आहे. सर्व सारख्या ताकदीचे असल्यामुळे सप्तरंगी लढत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात होणार आहे. तर या सामाजिक ध्रुवीकरणाच्या सप्तरंगी लढतीमध्ये सर्वात मोठ्या महा लोकशाही विकास आघाडीचे मुस्लिम समाजाचे एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचा अंदाज रोठेंनी यावेळी व्यक्त केला.
महायुती आणि महाआघाडीच्या दांभिक वल्गना आणि दिशाभूल करणाऱ्या राज्यकर्त्यांना सामान्य नागरिक विटला आहे. त्यामुळेच एक सक्षम पर्याय म्हणून
महा.राष्ट्र विकास आघाडी, भारत मुक्ती पार्टी, आझाद हिंद शेतकरी संघटना, लोकशाही संघर्ष, राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय बहुजन पार्टी, रिपब्लिकन पार्टी, एकलव्य पार्टी,भारत सुराज्य पार्टी ,अशा बारा राष्ट्रीय रजिस्टर अनरेकग्नाईस पक्षांच्या महा गटबंधनातून महा लोकशाही विकास आघाडी अण्णाराव पाटील यांच्या मुख्य संयोजनात स्थापित झाली आहे.
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलनिवासी वामन मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर, मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी आघाडीची चर्चा सुरू असून दोन एप्रिल ला आणखी काही पक्ष संघटना MLVS मध्ये सामील होणार आहे.
तर प्रथम यादीत जाहीर झालेल्या सर्व पक्षांचे व महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार जैसे थे राहुन दुसऱ्या यादीतील उमेदवारांची घोषणा सामूहिकरीत्या होणार आहे.
आझाद हिंद शेतकरी संघटनेने कार्य आणि पद्धत जिल्हा सह महाराष्ट्रातील शेतकरी महिला नागरिक यांना माहित आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच तीस वर्षानंतर प्रथमच राजकीय भूमिका आझाद हिंद शेतकरी संघटनेने घेतली आहे.
त्यामुळे प्रथमच लोकसभेच्या माध्यमातून राजकीय रणसंग्रामात आझाद हिंद शेतकरी संघटनेने प्रवेश केला आहे.
परंतु आझाद हिंद च्या इतर 26 विंग अराजकीय असून त्यांचा या आघाडीशी संबंध नसल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोठेनी जाहीर केले आहे.
यावेळी उमेदवार असलम शाह हसनशाह आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, प्रदेश महासचिव संजय एंडोले, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण कोकाटे पाटील, गुणवंत पाटील,अलकाताई खांडवे,जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाई गवई, वारकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष हभप गजानन महाराज झांबरे पाटील,सामाजिक कार्यकर्ते जाकीर शाह, मोहसीन अली शाह, महेबूब शाह, पवन ढगे पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. एक तास चाललेल्या वादळी पत्रकार परिषदेला शहरासह, जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, न्यूज चैनल चे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
_________________________
बुलढाणा
दिनांक: 30/03/2024.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा