मुख्य सामग्रीवर वगळा

तूर पिकातील व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

*तूर पिकातील व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन*

खामगांव तालुक्यातील तांदुळ वाडी, सावरगाव खुर्द येथील शेतकरी बांधवांना तालुका कृषि अधिकारी श्री.सुनील पवार, मंडळ कृषी अधिकारी व  कृषि पर्यवेक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक अलका टेके यांनी तांदूळवाडी, पोरज, नीमकवडा, भालेगाव परिसरात तूर पिकावरील पिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

सध्या वातावरण ढगाळ व थंडी असल्याने तुरीवरील किडीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे,मादी पतंग कळ्या आणि फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे तूर पिकात खालील पद्धतीने T आकाराचे स्टँड करून प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे लावावे. तूर पिकाच्या दीड फूट उंचीवर प्रती एकरी किमान 4-5 कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे.


आपण शेतकरी तूर पिकाला फुले यायची वाट न पाहता फवारणी करणे आवश्यक आहे.अळीवर्गीय कीड ही कळी वर फुल उमळण्याच्या आधीच आपली अंडी टाकतात,त्यातून बाहेर आलेली अळी ही कळ्या खावून टाकतात, त्यामुळे याच अवस्थेत तुरीला पहिली फवारणी आवश्यक आहे*


*तुरीच्या संवेदनशील अवस्थेत कीड व रोगाचे एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियत्रंण*

सध्या तूर पिकातील कमी कालावधीचे वाण हे शेंग भरणे अवस्थेत आहेत (वाण - BDN 711,708,716) शेतकरी बंधूंनो हीच वेळ तूर पिकाच्या कीड व रोग नियंत्रणाच्या दृष्टीने संवेदनक्षम असते. या कालावधीत पीक संरक्षणासाठी खालील एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीने नियोजन केल्यास अधिक फायदेशीर राहील.

*तूर पिकावरील किडीचे एकात्मिक पद्धतीने नियत्रंण पद्धत*

  *फुलधारणा ते 
शेंगा वाढीच्या अवस्थेत काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव वाढलेला आहे.
*तूर पीक शेंग भरणे अवस्थेत शेवटची फवारणी*
तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या 
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 
फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मि ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या सर्व बाबीवर नियत्रंण मिळवायचे असेल तर शेतकरी बांधवांनी तूर  पिका साठी वरीलप्रमाणे आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाली असल्यास फवारणी करणे अत्यंत महत्वाची आहे.
 


अशाप्रकारे शेतकऱ्यांनी वरील प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून तूर पिकावरील आळीवर्गीय किडीमुळे होणारे नुकसान टाळावे व तुरी मध्ये निश्चितपणे उत्पादन वाढण्यास मदत होईल,असे प्रतिपादन कु .ए. जे. टेके, कृषि सहाय्यक यांनी केले.

टीप - किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी संरक्षित किटचा वापर करावा.असे आव्हान कृषि सहाय्यक यांनी केले.
यावेळी गावातील संदीप जाधव, मिलिंद शिरसाट, बाजीराव शिरसाट, सुरेश जाधव, रामसिंग वतपाळ प्रगतशील शेतकरी,  उपस्थित होते.

टिप्पण्या