पोरज येथे नैसर्गिक शेती व सोयाबीन तूर कडधान्य प्रशिक्षण यशस्वी
दिनांक 10 सप्टेंबर 2025
खामगाव तालुक्यातील पोरज येथे नैसर्गिक शेती वर प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आले यामध्ये सोयाबीन कापूस पिकात फेरोमन ट्रॅप कसे लावायचे व त्याचे फायदे या विषयावर चर्चा व प्रात्यक्षिक करण्यात आले तर शेतकरी बांधवांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चा करून प्रत्यक्ष शेतात फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले..यावेळी गटाअंतर्गत प्रकल्पातील शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप, फवारणी किट वाटप करण्यात आले.तसेच गांडुळ खत, जीवामृत, बीजामृत सूक्ष्म मूलद्रव्य शेतकऱ्यांनी घरी कसे बनवायचे याची माहिती देण्यात आले.नैसर्गिक शेती प्रकल्पातील शेतकऱ्यांना घरीच खते बनवण्यासाठी प्लॅस्टिक टाकी घेण्याचे आव्हानं करण्यात आले.
सोयाबीन कडधान्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप कसे लावायचे प्रात्यक्षिक देण्यात आले व ट्रॅप चे फायदे सागून ट्रॅप वाटप करण्यात आले व सध्या सोयाबीन पिकावर आलेल्या रोग व किड बाबत माहिती देण्यात आली..
सदरील प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पोरज येथील अभिनव नैसर्गिक गटाचे अध्यक्ष श्री राजेंद्र बोराडे,कृषी सखी रजनी ढोण, पल्लवी बोराडे, गटातील सदस्य, सहाय्यक कृषी अधिकारी अलका टेके , सचिन बोराडे, वसंत संपत बोराडे, उमेश जाधव, चतरसिंग बोराडे, वसंत विनायक बोराडे, प्रशांत इंगळे, विजय बोराडे, प्रतापसिंग बोराडे, सुरेश मेले,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा