मुख्य सामग्रीवर वगळा

पोरज येथील शेतकरी गटाने एकत्रित येत केली उगवण क्षमता तपासणी...

पोरज येथील शेतकरी गटाने एकत्रित येत केली उगवण क्षमता तपासणी...



पोरज येथील शेतकरी महिला व पुरुष यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत गटाची बांधणी केली आणि एकत्रित खरेदी नंतर आज त्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी एकत्रित येत पूर्ण केली. उगवण क्षमता तपासणी कशी करायची तर एका गोणपाटावर हातात येईल ते 100 दाणे बियाणे घ्या. गोणपाट ओला करून एका रांगेत दहा बियाणे या प्रकारे दहा रंगा करा म्हणजे दहा  बियाणे चे दहा रंगा केल्यास 100 बियाणे ठेवा... नंतर त्याला गुंडाळून जेथे ओलावा सावली असेल तेथे ठेवा दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी त्या पोत्यावर टाका चार दिवसात बियान्याला कोम येईल मग किती बियाणे उगवले यावरून उगवण क्षमता ठरवा 70% पेक्षा जास्त असेल तर बियाणे पेरणीस योग्य आणि त्यापेक्षा कमी असेल तर ते बियाणे पेरणीस टाळा...
अशा प्रकारे बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करा...बियाणे उगम क्षमता (Germination Test) तपासणी करण्याचे अनेक फायदे आहेत:
चांगली उगवण किती होईल हे समजते – बियाण्यांपैकी किती टक्के बियाणे उगवतील याचा अंदाज येतो.
बियाण्याची गुणवत्ता कळते – बियाणे निरोगी, जिवंत आणि पेरणीस योग्य आहेत की नाही हे समजते.
पेरणीसाठी योग्य बियाण्याचे प्रमाण ठरवता येते – उगम क्षमता कमी असल्यास बियाणे जास्त वापरण्याचा निर्णय घेता येतो.
पुनर्पेरणीचा खर्च वाचतो – खराब उगवण झाल्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागू नये म्हणून आधीच तपासणी उपयोगी पडते.
वेळ आणि मजुरीची बचत होते – सुरुवातीलाच योग्य निर्णय घेतल्याने नंतरचा त्रास कमी होतो.
एकसमान उगवण मिळते – पिकाची वाढ एकसारखी झाल्यामुळे व्यवस्थापन सोपे होते.
उत्पादन वाढण्यास मदत होते – चांगली उगवण म्हणजे चांगली रोपसंख्या आणि त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता वाढते.
अशा प्रकारे पेरणी पूर्व कामे गटाने एकत्रित येऊन शेतकरी करत आहेत त्या साठी सर्व शेतकरी गटाचे हार्दिक अभिनंदन.... आणि शुभेच्छा.

टिप्पण्या