मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पोरज येथे नैसर्गिक शेती व सोयाबीन तूर कडधान्य प्रशिक्षण यशस्वी

पोरज येथे नैसर्गिक शेती व सोयाबीन तूर कडधान्य प्रशिक्षण यशस्वी  दिनांक 10 सप्टेंबर 2025  खामगाव तालुक्यातील  पोरज येथे नैसर्गिक शेती वर प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आले यामध्ये सोयाबीन कापूस पिकात फेरोमन ट्रॅप कसे लावायचे व त्याचे फायदे  या विषयावर चर्चा व प्रात्यक्षिक करण्यात आले तर शेतकरी बांधवांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चा करून प्रत्यक्ष शेतात फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले..यावेळी गटाअंतर्गत प्रकल्पातील शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप, फवारणी किट वाटप करण्यात आले.तसेच गांडुळ खत, जीवामृत, बीजामृत सूक्ष्म मूलद्रव्य शेतकऱ्यांनी घरी कसे बनवायचे याची माहिती देण्यात आले.नैसर्गिक शेती प्रकल्पातील शेतकऱ्यांना घरीच  खते बनवण्यासाठी प्लॅस्टिक टाकी घेण्याचे आव्हानं करण्यात आले.  सोयाबीन कडधान्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप कसे लावायचे प्रात्यक्षिक देण्यात आले व ट्रॅप चे फायदे सागून ट्रॅप वाटप करण्यात आले व सध्या सोयाबीन पिकावर आलेल्या रोग व किड बाबत माहिती देण्यात आली.. स...

कपाशी पिकातील रसशोषक किडी

कपाशी पिकावरील रोग व किडींचे वेळीच करा नियंत्रण..अलका टेके कृषिसहायक भालेगाव  पिंपळगाव राजा मंडळ मधील भालेगाव पोरज सावरगाव बुद्रुक सावरगाव खुर्द निमकवडा व आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसातील खंड व वातावरणातील बदल यामुळे कपाशी या पिकावर मोठ्या प्रमाणावर मावा तुडतुडे पांढरी माशी दिसून येत आहे .तरी शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून पिकाची काळजी घ्यावी. कपाशी (कापूस) पिकामध्ये मावा (Aphids), तुडतुडे (Jassids) आणि पांढरी माशी (Whiteflies) या रसशोषक किडी महत्त्वाच्या असून त्या पिकाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करतात. 🐛 कपाशी पिकातील रसशोषक किडी – माहिती व नियंत्रण --- 1. 🌿 मावा (Aphids) 🔍 वैज्ञानिक नाव: Aphis gossypii 🔎 ओळख: लहान, मऊ शरीराची कीड. काळसर ते हिरवट रंगाची, पानांच्या खालच्या बाजूस झुंडीनं आढळते. मधुरस शोषून घेतो व मधासारखा चिकट द्रव (हनीड्यू) सोडतो, ज्यावर काळी बुरशी (sooty mold) वाढते. 🛑 नुकसान: झाडांची वाढ खुंटते. पानं वाकडी, मुडपलेली होतात. फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो  हनीड्यूमुळे पाने काळसर दिसतात. --- 2. 🍃 तुडतुडे (Jassids / Leaf hoppers...

तूर पिकातील व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

*तूर पिकातील व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन* खामगांव तालुक्यातील तांदुळ वाडी, सावरगाव खुर्द येथील शेतकरी बांधवांना तालुका कृषि अधिकारी श्री.सुनील पवार, मंडळ कृषी अधिकारी व  कृषि पर्यवेक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक अलका टेके यांनी तांदूळवाडी, पोरज, नीमकवडा, भालेगाव परिसरात तूर पिकावरील पिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. सध्या वातावरण ढगाळ व थंडी असल्याने तुरीवरील किडीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे,मादी पतंग कळ्या आणि फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे तूर पिकात खालील पद्धतीने T आकाराचे स्टँड करून प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे लावावे. तूर पिकाच्या दीड फूट उंचीवर प्रती एकरी किमान 4-5 कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. आपण शेतकरी तूर पिकाला फुले यायची वाट न पाहता फवारणी करणे आवश्यक आहे.अळीवर्गीय कीड ही कळी वर फुल उमळण्याच्या आधीच आपली अंडी टाकतात,त्यातून बाहेर आलेली अळी ही कळ्या खावून टाकतात, त्यामुळे याच अवस्थेत तुरीला पहिली फवारणी आवश्यक आहे* *तुरीच्या संवेदनशील अवस्थेत कीड व रोगाचे एकात्मिक पद्धतीने कीड व रोग नियत्रंण* सध्या तूर पिकातील कमी कालावधीचे वाण हे शे...

निमकवडा पोरज शिवारामध्ये कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा

पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत कृषी विभागाची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निमकवडा पोरज शिवारामध्ये कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा तालुका कृषी अधिकारी सुनील पवार व मंडळ कृषी अधिकारी पिंपळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम चालू आहे दिनांक 27/11/2024 रोजी निमकवळा व पोरज येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. भू आणि जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्चाचा पर्याय म्हणजेच पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने कमी उताराच्या जागी वाळू मातीने सिमेंटच्या रिकाम्या गोण्या भरून वनराई बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. असे केल्याने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने जमिनीतील भूजल पातळी वाढते त्यामुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सिंचन क्षेत्रांमध्ये वाढ होते तसेच गुराढोरांचे व जंगलातील वन्य प्राण्यांची पुढील अनेक दिवसापर्यंत तहान भागविली जाईल. बंधारा बांधण्याकरिता कृषी सहाय्यक ए.जे टेके, पोरज येथील पोलीस पाटील सु...

प्रस्थापितांना लगाम लावण्यासाठी विस्थापितांची लढाई. अँड.सतीशचंद्र रोठे पाटील.

आबकी बार चारशेला  ब्रेक लागणार. प्रस्थापितांना लगाम लावण्यासाठी विस्थापितांची लढाई. MLVA चे एकमेव मुस्लिम उमेदवार असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी जाहीर. दोन एप्रिला अर्ज दाखल करणार. वादळी पत्रकार परिषदेत रोठेंची खास फटकेबाजी. सप्तरंगी लढतीत सामाजिक ध्रुवीकरणात अस्लम शाह विजयी होनार.          अँड.सतीशचंद्र रोठे पाटील. बुलढाणा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई लढण्यासाठी लोकसभेच्या रणसंग्रामात महा लोकशाही विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी 30 मार्चला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून MLVA चे संयोजक ॲड सतीशचंद्र रोठेंनी जाहीर केली आहे. ईव्हीएम, एनआरसी, सीएए, महागाई,भारतीय निवडणूक आयोग, बेरोजगारी, धर्मवाद जातिवाद, शिक्षण, अदानी अंबानी, खाजगीकरण यासह विकासात्मक कार्यावर महायुती महाआघाडीच्या उमेदवारांनी बोलावे. या राष्ट्रीय मुद्द्यांसह जिल्ह्यातील हुकूमशाही, दादागिरी, स्वगृही अधिकारी,अनधिकृत व्यवसाय, शेतकऱ्यांची व्यथा, रोही रानडुक्कर,क्राईम रेट, व्यसनाधीनता, यावर चिंता व्यक्त करीत लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणारी वक्तव्ये यावर...

गेल्या तीन दिवसापासून मी माझे 496 रुपये परत मिळवण्यासाठी, फेक अकाऊंटच्या साह्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मुलीबद्दल उघड करत आहोत. सावधान

सदर फोटो फेसबुक वरून घेतलेली आहे,  भिकारडी #साई_उर्फ_मृणाली_देशपांडे ची थरकाप उडवून देणारी सत्यता. खरी ओळख👇 पूर्ण नाव : चैताली ××××××× वय        :  27 वर्ष पत्ता      : लोंढे गल्ली पूर्व भाग सिन्नर  तालुका : सिन्नर जिल्हा  : नाशिक गेल्या तीन दिवसापासून मी माझे 496 रुपये परत मिळवण्यासाठी, फेक अकाऊंटच्या साह्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मुलीबद्दल उघड करत आहोत.  पण विदर्भाच्या दुर्गम भागातल्या एका जंगलात जिथे कॉलिंग साठी बरोबर नेटवर्क नाही तश्या 40 घरांच्या एक छोट्या आदिवासी पाडा मध्ये शेती करणाऱ्याला बघून माझ्या फ्रेंड लिस्टमधील आणि समस्थ फेसबुकवासी  99.99 टक्के लोकांनी या विषयाला मस्करी समजून घेतला. आणि  काहींनी तर उघडपणे मला कमकुवत बुद्धीचा स्त्री लंपट असल्याने फसवणूक झाली म्हणून ज्ञान दिले. तर काहींनी म्हंटले "आज पर्यंत अनेक लोकांचे लाखो-करोडो रुपये लुटलेल्यांना सायबर एक्सपर्ट, पोलीस पकडू शकले नाही. तू काय घंटा पोहचणार त्यांच्या पर्यंत." पण मी तुम्हांला सुरवातीपासून समजवण्याचा प्रयत्न करत आहोत की विषय माझ्या 496...