आबकी बार चारशेला ब्रेक लागणार. प्रस्थापितांना लगाम लावण्यासाठी विस्थापितांची लढाई. MLVA चे एकमेव मुस्लिम उमेदवार असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी जाहीर. दोन एप्रिला अर्ज दाखल करणार. वादळी पत्रकार परिषदेत रोठेंची खास फटकेबाजी. सप्तरंगी लढतीत सामाजिक ध्रुवीकरणात अस्लम शाह विजयी होनार. अँड.सतीशचंद्र रोठे पाटील. बुलढाणा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई लढण्यासाठी लोकसभेच्या रणसंग्रामात महा लोकशाही विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून असलम शाह हसन शाह यांची उमेदवारी 30 मार्चला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून MLVA चे संयोजक ॲड सतीशचंद्र रोठेंनी जाहीर केली आहे. ईव्हीएम, एनआरसी, सीएए, महागाई,भारतीय निवडणूक आयोग, बेरोजगारी, धर्मवाद जातिवाद, शिक्षण, अदानी अंबानी, खाजगीकरण यासह विकासात्मक कार्यावर महायुती महाआघाडीच्या उमेदवारांनी बोलावे. या राष्ट्रीय मुद्द्यांसह जिल्ह्यातील हुकूमशाही, दादागिरी, स्वगृही अधिकारी,अनधिकृत व्यवसाय, शेतकऱ्यांची व्यथा, रोही रानडुक्कर,क्राईम रेट, व्यसनाधीनता, यावर चिंता व्यक्त करीत लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणारी वक्तव्ये यावर...